नविन वाहन तारण कर्ज

कर्ज कोणास घेता येईल ?

1. नविन वाहनासाठी अर्जदार बँकेचा अ किंवा ब वर्ग सभासद असावा.

2. अर्जदार व जामिनदार कर्ज रक्कम परतफेडीचे दृष्टीने उत्पन्नधारक असावेत.

कर्जास तारण :-

1. खरेदी करत केलेले वाहन

नविन वाहनासाठी अ किंव्हा ब वर्ग (नाममात्र) एक सक्षम जामीनदार घेण्यात यावा तसेच चारचाकी नविन व जुन्या वाहनासाठी दोन अ किंव्हा ब वर्ग सभासद असलेले सक्षम जामीनदार घेण्यात यावेत.

कर्जाची रक्कम :-

1.नविन दुचाकी वाहनासाठी विमा व टॅक्स् धरून कोटेशनच्या 75% पर्यंत कर्ज देता येईल.

2. नविन चारचाकी वाहनासाठी विमा व टॅक्स् धरून कोटेशनच्या 75% पर्यंत कर्ज देता येईल

3. 3 वर्षांच्या आतील जुन्या चारचाकी वाहनासाठी वाहनाच्या मुल्यांकनाच्या 50% ते 60% पर्यंत कर्ज देता येईल

दुरावा (मार्जिन) :-

1. नविन वाहनांस कमीत कमी 25% व 3 वर्षांच्या आतील जुन्या वाहनांस 40% ते 50% दुरावा ठेवण्यात येईल. दुराव्याची रक्कम अर्जदाराने बचत/चालु खात्यात भरणा केलेली पाहिजे.

व्याजाचा दर व व्याज आकारणी :-

1. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व संचालक मंडळाच्या आदेशाप्रमाणे व्याजाचे दर वेळोवेळी बदलले जातील. सध्या नविन वाहनासाठी द.सा.द.शे. खासगी वापर वाहनासाठी 9% व व्यावसायिक वापर वाहनासाठी 11% व्याजदर आकारला जाईल

परतफेड :-

1. सदर कर्ज दुचाकी वाहन असल्यास रू. 50,000/- साठी 3 वर्ष, रू. 1,00,000/- साठी 5 वर्षे असेल. चारचाकी वाहन असल्यास कमाल परतफेड मर्यादा 5 वर्ष इतकी असेल.

2. नोकरदार कर्मचाऱ्याने कर्जाचा हप्ता पगारातून कपात करणेबद्दल लेखी हमीपत्र दिले पाहिजे.

कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-

1.विहीत नमुन्यातील अर्ज तपशीलवार माहितीसह.

व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार व संचालक मंडळाच्या मंजुरीनुसार वेळोवेळी बदल अधिकार बँकेच्या संचालक मंडळास राहील.

< कॅशक्रेडीट कर्जशेती पाईप लाईन >