सोनेतारण कर्ज
कर्ज कोणास घेता येईल ?
1. अर्जदार बँकेचा अ किंवा ब वर्ग सभासद/खातेदार असला पाहिजे.
कर्जास तारण :-
1. अर्जदार तारण देत असलेले सोनेचे दागिने हे स्वतः च्या मालकीचे असले पाहिजे.
कर्जाची रक्कम :-
1. कर्जाची अधित्तम मर्यादा रू. १.०० लाख मात्र राहील.
दुरावा (मार्जिन) :-
1. कर्ज मंजुरीची रक्कम ही मूल्यांकनाच्या प्रमाणात ठरविण्यात येईल त्यानुसार बँकेचे मा. संचालक मंडळ सभेत सदर निर्णय होऊन त्या दरम्यानच्या बाजारभावाचा अंदाज घेऊन बेस प्राईज ठरविण्यात येईल व त्यानुसार जास्तीत जास्त ८०% पर्यंत कर्ज रक्कम मंजूर करण्यांत येईल. मूल्यांकन बँकेचे अधिकृत सराफाकडून मुल्यांकन केलेल्या प्रमाणपत्रामध्ये दागिन्यांचे वर्णन, दागिन्यांच्या चोखपणा, दागिन्यांचे ढोबळ व निव्वळ वजनच्या स्पष्ट उल्लेख असावा.
व्याजाचा दर व व्याज आकारणी :-
1. सदर कर्जावर द.सा.द.शे. १०% व्याज व महिलांसाठी १०% आकारले जावून ते दर महिन्याला कर्ज खात्याला नावे टाकले जाईल.
परतफेड :-
1. सदर कर्जाच्या परतफेडीसाठी मुदत ही १२ महिने असेल.