वैयक्तिक कर्ज
कर्ज कोणास घेता येईल ?
1. अशा प्रकारचे कर्ज घेण्यासाठी बँकेचा अ किंवा ब वर्ग सभासद होणे आवश्यक आहे.
2. अर्जदार व जामिनदार कर्ज रक्कम परतफेडीचे दृष्टीने उत्पन्नधारक असावेत.
कर्जाची रक्कम :-
कर्जाची वैयक्तिक कमाल मर्यादा (विनातारण) रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार वेळोवेळी ठरविण्यात येईल. सध्या वैयक्तिक कर्जाची जास्तीत-जास्त रू. 1.00 लाख इतकी मर्यादा आहे.
व्याजाचा दर व व्याज आकारणी :-
विनातारणी कर्जासाठी द.सा.द.शे. 12.5% दराने व्याजाची आकारणी मासिक पद्धतीने करण्यात येईल. थकबाकीवर 2% दंडव्याज आकारण्यात येईल. मात्र सदर कर्जासाठी आकारणी मासिक पद्धतीने करण्यात येईल.
परतफेड :-
1. सदर कर्जाची मुदत 3 ते 5 वर्षे राहील.
2. कर्ज व्यवहार असमाधानकारक असल्यास (सलग 3 हप्ते थकविल्यास खाते एनपीए झाल्यास) संपूर्ण कर्जाची एकरकमी व्याजासह परतफेड करावी लागेल.
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-
विहीत नमुन्यातील अर्ज तपशीलवार माहितीसह.
अर्जदार व जामिनदार कागदपत्रे :-
1. पासपोर्ट आकारचे अद्यावत रंगीत फोटो
2. अद्यावत लाईट बिल प्रत
3. पॅनकार्ड व आधार कार्ड प्रत
4. नोकरी करीत असलेल्या ठिकाणचे आयडी कार्ड
5. मागील 3 महिन्याचे पगार पत्रक फॉर्म नं. 16 सह
6. पगार जमा होत असलेल्या बँकेचा खात्याचा व इतर बँकेत असलेल्या बचत अथवा कर्ज खात्यांचा मागील एक वर्षांचा खाते उतारा.
7. अर्जदार यांचे पगार जमा होत असलेल्या बँकेचे 10 चेक्स्
अर्जदार व जामिनदार व्यवसायिक असल्यास :-
1. पासपोर्ट आकाराचे अद्यावत रंगीत फोटो
2. अद्यावत लाईट बिल झेरॉक्स्
3. पॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स्
4. इतर बँकेत असलेल्या चालू, बचत अथवा कर्ज खात्यांचे मागील एक वर्षाचे खाते उतारे.
5. अर्जदाराचे इतर बँकेचे 10 चेक्स्