कॅशक्रेडीट कर्ज
कर्ज कोणास घेता येईल ?
1. अर्जदार व्यक्ति/फर्म बँकेचे अ किंवा ब वर्ग सभासद होणे आवश्यक आहे.
कर्जाची कारणे :-
1. कायद्याने मान्य असलेल्या कोणत्याही खरेदी-विक्री व्यवसाय करणार्या व्यापारास तसेच उत्पादन करून विक्री करणार्या उद्योगास भांडवली खर्चासाठी व खेळत्या भांडवलासाठी सदर कर्ज देण्यात येईल.
कर्ज मर्यादा व दुरावा :-
1. या योजना अंतर्गत कॅश क्रेडीट कर्ज मर्यादा स्थावर मिळकतीच्या तारणावर जास्तीत जास्त 70% देण्यात येईल.
2. सदर कर्जासाठी स्टॉक मालापोटी दुरावा 40% राहिल व 50% पर्यंत किंवा संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार कर्ज उचल देण्यात येईल.
व्याजाचा दर :-
1. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे संचालक मंडळ वेळोवेळी ठरविल त्याप्रमाणे व्याजाची आकारणी करण्यात येईल. सध्या १२.५ % प्रमाणे व्याजदर राहील व दंडव्याज 2% आकारण्यात येईल.
कर्जासाठी तारण :-
1. दुकानासाठी 90 दिवसांचे आतील काळातील स्वतःचे मालकिचा शिल्लक स्टॉक
2. दोन सक्षम सभासद असलेले जामिनदार
3. तारणाचे50% पर्यंत कर्ज आदा केले जाईल
4. कर्ज मंजुरीसाठी जादा तारण व जामिनदार घेणेचा अधिकार संचालक मंडळास राहिल.
परतफेड :-
1. सदर कर्जाची मुदत एक वर्षांची राहील. मुदत वाढविण्याचा अगर कमी करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील.