घर बांधणी कर्ज
कर्ज कोणास घेता येईल ?
1. अशा प्रकारचे कर्ज घेण्यासाठी बँकेचा अ किंवा ब वर्ग सभासद होणे आवश्यक आहे.
2. अर्जदार व जामिनदार कर्ज रक्कम परतफेडीचे दृष्टीने उत्पन्नधारक असावेत.
कर्जाची रक्कम :-
कर्जाची वैयक्तिक कमाल मर्यादा (विनातारण) रिझर्व्ह बँक व मा.संचालक मंडळाच्या आदेशानुसार वेळोवेळी ठरविण्यात येईल.
कर्जाचे कारण/तारण :-
1. घर बांधणी/फ्लॅट खरेदी/घर दुरूस्ती
2. कमाल कर्ज मर्यादा – घराच्या मुल्यांकनाच्या जास्तीत जास्त 70% पावेतो.
3. परतफेडीची मुदत (कमाल) – 20 वर्षे (240 महिने) राहील.
4. व्याजदर द.सा.द.शे. 12% व दंडव्याज द.सा.द.शे. 2% प्रमाणे आकारण्यात येईल.
जूने घर खरेदी :-
1. कमाल कर्ज मर्यादा – घराच्या मुल्यांकनाच्या जास्तीत जास्त 70% पावेतो.
2. परतफेडीची मुदत (कमाल) – 15 वर्षे (180 महिने) राहील.
3. व्याजदर द.सा.द.शे. 12% व दंडव्याज द.सा.द.शे. 2% प्रमाणे आकारण्यात येईल.
दुरावा (मार्जिन) :-
1. नविन घरासाठी 20% व जुन्या घरासाठी / घर बांधकामासाठी 30% दुरावा ठेवण्यात येईल व दुराव्याची रक्कम बचत/चालु खात्यात जमा केलेली असावी.
2. घर बांधकामाच्या इस्टिमेटच्या 70% कर्ज मंजूर करण्यात येईल.