बचत ठेव खाते

पात्रता

कोणतीही भारतीय नागरिकत्व असलेली व्यक्ती, पात्र असलेली संस्था तसेच १८ वर्षांखालील लहान मुले (पालकत्वासहीत) बचत खाते उघडु शकते.

वैशिष्ट्ये आणि लाभ
  • कमीत कमी रक्कम रु. २०० / – सह खाते उघडता येते.
  • वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / संरक्षणासह अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा.
  • सीटीएस चेक बुक सुविधा
  • कोअर बँकिंग सुविधा
  • पासबुक सुविधा.
  • खातेवरील व्यवहारांची माहिती एस एम एस द्वारे
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती विमा योजना
  • एनईएफटी /आरटीजीएस सुविधा उपलब्ध
वैध आवश्यक कागदपत्रे

किमान दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि अधिकृत कागदपत्रांपैकी एखादे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कागदपत्रे आवश्यक,

1. निवासाचा पुरावा* (आधार कार्ड, पासपोर्ट, वाहक परवाना, मतदार ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल, अलीकडचे बँक खाते स्टेटमेंट, आयकर/ संपत्ती कर आकारणी आदेश, कायमस्वरूपी निवासाच्या पुराव्यासहित नोंदणीकृत किंवा नोटराईज्ड लिव्ह अँड लायसन्स करार इ. )

2. फोटोसहित ओळखपत्र* (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहक परवाना, मतदार ओळखपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नामांकित कंपनीने दिलेले ओळखपत्र इ.)

3. पॅन कार्ड*

4. आधार कार्ड*


चालू खाते