आमच्या विषयी
कोयना सहकारी बँक सर्वसामान्यांची पसंती असणारी बँक म्हणून ओळखली जाते. समाजातील सर्वसामान्य व गरजू लोकांकरीत मा. आ. विलासरावजी पाटील (काका) माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य. यांचे मार्गदर्शनाखाली माननीय अँड. श्री उदयसिंह पाटील (दादा) यांनी बँकेची स्थापना केली. 21 ऑक्टोबर 1996 रोजी कराड येथील दत्त चौक येथे बँकेची प्रथम शाखेची स्थापना झाली.
जस एखादं रोप लावलं जातं आणि ते हळूहळू बहरत जातं. आणि वृक्षाच्या फांद्या वाढतच जातात त्याचप्रमाणे कोयना सहकारी बँकेने सुद्धा व्यवसायाचा विस्तार हा वाढवला आहे. आज बँकेने पुणे व सातारा या दोन्ही जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध शहरांमध्ये ग्राहकांच्या सेवेकरीत शाखा कार्यरत आहेत.
आज बँकेची आर्थिक स्थिती पाहिली तर समाधानकारक वाटते रिझर्व बँक ऑफ इंडिया यांची तपासणी अहवालानुसार बँकेस वर्ग ब प्राप्त झाला आहे.
बँकेची 31 मार्च 2024 अखेर ठेवी 177.41 कोटी असून बँकेची कर्जे 115.11 कोटी इतकी आहेत. तसेच बँकेचा CRAR-15.91% इतका ठेवलेला आहे.
बँकेच्या सर्व शाखेमध्ये कोअर प्रणाली आहे. तसेच ग्राहकांकरिता एस. एम. एस, ए . टी . एम . कार्ड, मिस कॉल अलर्ट, प्रधानमंत्री विमा योजना, लॉकर्स ,एनईएफटी/आरटीजीएस इत्यादी सेवा उपलब्ध केले आहेत